सेवा भारतीला अमर सिंह यांची ३ कोटींची संपत्ती भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |


 
 
 
नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांनी आपली वडिलोपार्जित संपत्ती राष्ट्रीय सेवा भारतीला दान केली आहे. अमर सिंह यांची ही संपत्ती आजमगढच्या लालगंजमधील तरवा येथे आहे. लालगंज तहसीलचे उप निबंधक सुनील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अमर सिंह यांच्या संपत्तीचे सरकारी मुल्यांकन २ कोटी ९१ लाख ५५ हजार रुपये आहे. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ही संपत्ती समर्पित करत असल्याचे अमर सिंह यांनी सांगितले.
 

या संपत्तीमध्ये शेतजमीन आणि घराचा समावेश आहे. अमरसिंह यांच्या या घराचे वैशिष्ट्य म्हणजे या घराची खिडकी बुलेटप्रुफ असून घरात एक लिफ्टदेखील आहे. या संपत्तीची नोंदणी करण्यात आली. ही नोंदणी करताना राष्ट्रीय सेवा भारतीचे राष्ट्रीय महामंत्री ऋषीपाल सिंह आणि खजिनदार मुकेशकुमार शर्मा हे अमरसिंह यांच्यासह उपस्थित होते. अमर सिंह यांनी राष्ट्रीय सेवाभारतीला दान केलेल्या संपत्तीवर सेवा भारती 'ठाकूर हरिश्चंद्र सेवा' केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन मंत्री ऋषिपाल सिंह ददवाल यांनी ही माहिती दिली.

 

 
 

दरम्यान, आझमगडमध्ये धर्माच्या नावाखाली घाणेरडे राजकारण केले जात असल्याचे अमर सिंह यांनी म्हटले. तसेच प्रियंका गांधी या मेहनती जरी असल्या तरी दिल्ली त्यांच्यासाठी सोपी नाही. असे वक्तव्य अमर सिंह यांनी केले. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी उचलेल्या पावलांचे अमर सिंह यांनी कौतुक केले. यापूर्वी लष्कराला गोळ्या झाडण्यासाठी आदेश द्यावे लागत असत. परंतु मोदी सरकारने भारतीय लष्कराला स्वातंत्र्य दिले आहे. असे म्हणत अमर सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@