महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |

 

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीद्वारे सन २०१७-१८ या वर्षासाठीचे पुरस्कार आज घोषित करण्यात आले. अकादमीतर्फे तीन प्रकारचे पुरस्कार दिले जातात. या वर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये २ अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, ८ राज्य स्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, तसेच २० विधा पुरस्कार अशा एकूण ३० पुरस्कारांचा समावेश आहे.

 

यावर्षी 'अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव' पुरस्कारांमध्ये 'महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार' रंगनाथ तिवारी तसेच डॉ. राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्काररामेश्वरनाथ मिश्र 'अनुरोध' यांना प्रदान करण्यात येणार आहे. राज्य स्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारांतर्गत 'छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार' प्रेम शुक्ल, 'साने गुरूजी राष्ट्रीय एकता पुरस्कार' श्रीमती मंजु लोढा, 'पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार' डॉ. तेजपाल चौधरी, 'डॉ उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार' श्रीमती पूजाश्री, 'गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार' सुधीर ओखदे, 'कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार' माणिक बाबुराव मुंडे, 'व्ही शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा पुरस्कार' डॉ. विनोद नारायण इंदुरकर, 'सुब्रमण्य भारती हिंदी सेतू विशिष्ट सेवा पुरस्कार'डॉ. श्रीभगवान तिवारी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

 

'विधा' पुरस्कारांतर्गत 'काव्य' या विधासाठी देण्यात येणारा 'संत नामदेव पुरस्कार' शीतला पांडेय- समीर 'अनजान' यांना स्वर्ण, श्रीमती सुधा राठौर यांना रजत तसेच डॉ. मुकेश गौतम यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'कहानी' या विधासाठी देण्यात येणारा 'मुंशी प्रेमचंद पुरस्कार' श्रीमती मंजुला जोशी यांना स्वर्ण, कृष्ण नागपाल यांना रजत, तसेच डॉ. शशि वर्धन शर्मा-(शैलेश) यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'निबंध' या विधासाठी देण्यात येणारा 'आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार' श्रीमती प्रभा मेहता यांना स्वर्ण, शिव प्रसाद तिवारी यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'समीक्षा' या विधासाठी देण्यात येणारा'आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार' डॉ. मजीद शेख यांना स्वर्ण, डॉ. पंडित बन्ने यांना रजत, तसेच डॉ. शशिकांत सोनवणे 'सावन' यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'अनुवाद' या विधासाठी देण्यात येणारा'मामा वरेरकर पुरस्कार' श्रीमती कुमुद संघवी चावरे यांना स्वर्ण व रासबिहारी पाण्डेय यांना रजत पुरस्कार देण्यात येणार आहे. 'वैज्ञानिक तकनीकी' या विधासाठी देण्यात येणारा 'होमी जहांगीर भाभा कांस्य पुरस्कार'मुकेश ग. पंडया यांना देण्यात येणार आहे. 'हिंदी भाषा, भाषा शास्त्र तथा व्याकरण संबंधी लेखन' या विधासाठी देण्यात येणारा 'पं. महावीर प्रसाद द्विवेदी कांस्य पुरस्कार' डॉ. दिनेश प्रताप सिंह यांना देण्यात येणार आहे. 'नाटक' या विधासाठी देण्यात येणारा 'विष्णुदास भावे स्वर्ण पुरस्कार' डॉ. मधुकर राठोड यांना देण्यात येणार आहे. 'जीवनी-परक साहित्य' या विधासाठी देण्यात येणारा 'काका कालेलकर रजत पुरस्कार' डॉ. जितेन्द्र पाण्डेय यांना देण्यात येणार आहे. 'पत्रकारिता-कला' या विधासाठी देण्यात येणारा 'बाबुराव विष्णू पराडकर कांस्य पुरस्कार' अनुप श्रीवास्तव यांना देण्यात येणार आहे. 'लोकसाहित्य' या विधासाठी देण्यात येणारा 'फणीश्वरनाथ रेणू स्वर्ण पुरस्कार' श्रीमती निर्मला डोसी यांना देण्यात येणार आहे. 'बालसाहित्य' या विधासाठी देण्यात येणारा 'सोहनलाल द्विवेदी कांस्य पुरस्कार' श्रीमती नीलम सक्सेना 'चंद्रा' यांना देण्यात येणार आहे.

 

सर्व पुरस्कार विजेत्यांना अकादमीकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम दिली जाते. 'अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव' पुरस्कारासाठी रू. १ लाख, 'राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारासाठी ५१ हजार रू. आणि विधा पुरस्कारासाठी स्वर्ण, रजत, कांस्य अशा तीन प्रकारात अनुक्रमे ३५ हजार रू, २५ हजार रू.आणि ११ हजार रू.रोख देण्यात येतात. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे यासाठीचा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार दिनांक ०१ मार्च २०१९ रोजी सायं. ६.०० वाजता रामा आणि सुंदरी वाटुमल ऑडिटोरिअम, के. सी. कॉलेज, चर्चगेट, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या ‍विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@