आर्ची पोलीस बंदोबस्तात देणार बारावीची परिक्षा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 

आर्ची देणार बारावीची परिक्षा, परिक्षा केंद्राने मागितला पोलीस बंदोबस्त

 

सोलापूर : येत्या २१ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परिक्षा सुरु होत आहे. बारावीचे सगळे जोमाने विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. पण अभिनेत्री रिंकु राजगुरु हिच्यापुढे मात्र मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ‘सैराट’ फेम आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकु राजगुरू यंदा इयत्ता बारावीची परिक्षा देणार आहे. रिंकुचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. एखाद्या कार्यक्रमाला रिंकु येणार असेल, तर रिंकुची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड संख्येने गर्दी करतात. त्यामुळे रिंकुला पाहण्यासाठी इयत्ता बारावीच्या परिक्षा केंद्रावरही चाहत्यांची गर्दी होऊ शकते. अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी, रिंकु परिक्षा देणार असलेल्या परिक्षा केंद्र ज्या महाविद्यालयामध्ये आहे, त्या महाविद्यालयाने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

 

सोलापूरमधील टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील या परिक्षा केंद्रातून रिंकू राजगुरु परिक्षा देणार आहे. या महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी सातपुते यांनी टेंभूर्णी येथील पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. अशी मागणी करणारे पत्र महाविद्यालयाकडून या पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे. रिंकु राजगुरु बाहेरून बारावीची परिक्षा देणार आहे. यापूर्वी इयत्ता दहावीची परिक्षादेखील रिंकुने बाह्य विद्यार्थी म्हणून दिली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@