जम्मू-काश्मीरमध्ये जैशच्या २ दहशतावाद्यांना कंठस्नान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2019
Total Views |



 
 
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये शुक्रवारी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान, जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. पुलवामा येथील दब्रगम या परिसरात दहशतवादी लपून बसले होते. ही माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर या परिसराला सुरक्षा दलाने घेराव घातला आणि कारवाई केली. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. एकीकडे सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना ठार केले. पण दुसरीकडे मात्र बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला.
 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांवर गोळीबार केला होता. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलातील जवानांनी गोळीबार केला. या चकमकीदरम्यान इनायत अब्दुल्ला जिगर आणि शाहिद मुश्ताक बाबा या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. शाहिद मुश्ताक बाबा हा दहशतवादी अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. सुरक्षा यंत्रणांकडून त्याचा शोध सुरु होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@