'स्वीडीश डॅड्स-इंडियन डॅड्स' प्रदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2019
Total Views |



मुंबई : “पूर्वी केवळ मातांनाच प्रसुती रजा मिळत असे. ज्यामुळे तिला घरी राहून आपल्या बाळाची काळजी घेणे सोयीस्कर होते.पण, आजच्या काळात वडीलसुद्धा पितृत्व रजा मागू लागले आहेत. मुलांच्या संगोपनामधील 'पिता' या भूमिकेबाबतच्या 'स्वीडीश डॅड्स- इंडियन डॅड्स' छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही लैंगिक समानतेबद्दल संवेदनशील असलेल्या पुरुषांची बाजू दाखवणार आहोत. नवजात बाळ हे पूर्वी केवळ स्त्रियांची जबाबदारी मानली जात होते. पण, स्वीडीश छायाचित्रकार जोहान बेव्हमन आणि भारतीय छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांनी वास्तवात पित्याच्या भूमिकेत असलेल्या पुरुषांना 'मॉडेल' म्हणून समोर आणले. त्यामुळे वडील आणि मुलांच्या नातेसंबंधातला एक वेगळा दृष्टिकोन या प्रदर्शनात पाहायला मिळतो,” असे मत मुंबईतील स्वीडनच्या महावाणिज्यदूत उलरिका संडबर्ग यांनी व्यक्त केले. हे छायाचित्र प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील कुमारस्वामी सभागृहात दि. २ ते १० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केले आहे.

 

पुरुषही आदर्श पालक होतील

 

मुलांच्या संगोपनाबाबत छायाचित्रांच्या माध्यमातून पितृत्व रजेवर असलेल्या पालकांचे आयुष्य दाखवून, आपली मुले व कुटुंब यांना नोकरी किंवा करिअरपेक्षा प्राधान्य देणार्या पुरुषांवर मी भर दिला आहे. या प्रकल्पाच्या मदतीने वडील व जोडीदार म्हणून असलेल्या भूमिकेसाठी मी पुरुषांना प्रेरित करेन. जर त्यांनी ही भूमिका निभावली तर पुरुषही आदर्श पालक होतील,” असे मत स्वीडनचे छायाचित्रकार जोहान बेव्हमन यांनी व्यक्त केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@