महाराष्ट्रकन्या स्मृती मंधाना ठरली अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : आयसीसीने जाहीर केलेल्या महिला क्रिकेटपटूंच्या एकदिवसीय क्रमवारीत मराठमोळ्या स्मृती मंधानाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. स्मृतीने मागील १५ एकदिवसीय सामन्यांत ८ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत. न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या धडाकेबाज कामगिरीचा तिला फायदा झाल्याने क्रमवारीत तिने अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.

 

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत स्मृती मंधानाने शानदार कामगिरी करताना कारकिर्दीतले चौथे शतक झळकावले होते. त्याबरोबर, तिने नाबाद ९० धावांची खेळी केली होती. या कामगिरीमुळे तिने ३ स्थानांची झेप घेत ७५१ गुणांसह क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला. स्मृतीने प्रथम क्रमांक पटकावताना ऑस्ट्रेलियाच्या ऐलिस पेरी आणि मेग लॅनिंग यांना मागे टाकले. तर, भारताची अनुभवी फलंदाज मिताली राज २ स्थानांनी घसरुण पाचव्या क्रमांकावर आली आहे.

 

महिलांच्या गोलंदाजी क्रमवारीत वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने एका क्रमांकाची प्रगती करताना चौथे स्थान पटकावले आहे. तर, पुनम यादव आणि दिप्ती शर्मा यांनी पाच स्थानांची प्रगती करताना अनुक्रमे आठवे व नववे स्थान पटकावले. गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तानची सना मिर पहिल्या क्रमांकावर आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@