राहुल गांधींना अयोध्येत राम मंदिर हवे की नको?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा राहुल गांधींना सवाल

 

डेहराडून : अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावे, ही भाजपची भूमिका आहे. राहुल गांधींना अयोध्येत राम मंदिर हवे की नको? याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले आहे. उत्तराखंडमधील डेहराडून येथून अमित शाह बोलत होते. शनिवारी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले.

 
राम मंदिराच्या मुद्द्यावरून अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना हा सवाल केला. तसेच उत्तर प्रदेशातील सप-बसप आघाडीवर अमित शाह यांनी टीका केली. “एकेकाळी एकमेकांचा चेहराही न बघणारे, एकमेकांना नमस्कारही न करणारे लोक आता एकत्र येऊ लागले आहेत, यावरूनच भाजपची ताकद किती वाढली आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळेच सर्वांना एकत्र यावे लागले.” असे अमित शाह यावेळी म्हणाले.
 

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशात गरिबांना उपचार मिळत नव्हते. पंतप्रधान मोदींनी आयुष्मान भारत योजना आणली. आता गरिबांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहेत. राजीव गांधी सांगायचे की दिल्लीतून एक रुपया पाठवला की शेवटपर्यंत १५ पैसेच पोहोचतात. आम्ही सत्तेत आल्यावर बँक थेट खात्यात पैसे जमा केले. असे अमित शाह यांनी म्हटले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@