दीदी हा खेळ किती दिवस चालणार? ; पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2019
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते. बंगालमधील ठाकूरनगरमध्ये एका रॅलीला मोदी यांनी यावेळी संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी यावेळी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला. "रॅलीमध्ये उपस्थित जनसंख्या पाहून मला समजतेय की, दीदी हिंसेच्या मार्गावर का जात आहेत. हा खेळ किती दिवस चालणार?" असा सवाल त्यांनी केला.

 

मोदी यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कडाडून टीका केली. सभेदरम्यान मोदी यांनी नागरिकता संशोधन विधेयकाचा उल्लेख केला. तसेच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला या विधेयकाला राज्यसभेत पाठिंबा देण्याची विनंती केली. स्वातंत्र्यानंतर अनेक लोक त्यांना वाटले त्याठिकाणी राहत होते. मात्र, त्यांना त्रास झाल्यानंतर ते भारतात परतले. यामध्ये हिंदू, शीख, पारसी आणि ख्रिश्चन यांचा समावेश होता. त्यामुळे आम्ही नागरिकता संशोधन विधेयक आणण्याचा निर्णय घेतला, असे मोदी म्हणाले.

 

शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाची मोदींनी स्तुती केली. शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले ६ हजार रुपयांचे उत्पन्न सहाय्य हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे मोदी म्हणाले. "इतिहासात पहिल्याच वेळी यंदा अर्थसंकल्पात काही मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूकांनंतर जेव्हा पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येईल तेव्हा शेतकरी, तरुण पिढी आणि समाजाचे एकंदर चित्र बदललेले असणार आहे." असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रचंड झालेल्या गर्दीमुळे मोदींनी भाषण १५ मिनिटांमध्येच आवरते घेतले. काही जणांनी गोधळ घातल्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@