पश्चिम रेल्वेमार्गावर ११ तासांचा महामेगाब्लॉक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर २ फेब्रुवारी शनिवार रोजी रात्रीपासून ११ तासांचा महामेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. २ फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री १० वाजल्यापासून ते ३ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या या काळात लोअर परळ ते चर्चगेट दरम्यान एकही लोकल ट्रेन धावणार नाही.
 

अंधेरी, विरार, वसई, भाईंदर, बोरिवली स्टेशनमधून सुटणाऱ्या लोकल ट्रेन प्रभादेवी स्टेशनमर्यंत चालविण्यात येतील. ११ तासांच्या या महामेगाब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वे मार्गावरील एकूण २०५ लोकल ट्रेन सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत. ४० टन वजनी दोन क्रेनच्या साहाय्याने लोअर परळ येथील उड्डाणपुलाला नवे गर्डर टाकण्यात येणार आहे. लोअर परळ स्टेशनजवळील डिलाईज पूल गंजला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम रेल्वेने पूल तोडून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल बंद होता. 

 

मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांचे हाल होऊ नयेत, म्हणून बेस्टकडून या मार्गावरून विशेष बससेवा चालविण्यात येणार आहे. बॅकबे आणि वरळी डेपोतून प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा बसेस सोडण्यात येणार आहेत. चर्चगेट ते दादर दरम्यान या बसेस धावतील. मरीन लाईन्स, चर्नी रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ आणि प्रभादेवी अशा सर्व बस स्थानकांवर या बसेस थांबतील. २ फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री ९ : ३० ते १: ३० वाजेपर्यंत या विशेष बसेस धावतील. त्यानंतर पहाटे ३:३० ते सकाळी १० वाजेपर्यंत विशेष बसेस धावतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@