नक्षलवाद संबंध; आनंद तेलतुंबडेला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2019
Total Views |



 
 
 
मुंबई : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून आनंद तेलतुंबडेला शनिवारी पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली. पहाटे साडेतीन वाजता मुंबई विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर विलेपार्ले येथील पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली. शुक्रवारी पुणे न्यायालयाने तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. शनिवारी तेलतुंबडे यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
 

अटक टाळण्यासाठी आनंद तेलतुंबडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना कनिष्ठ न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर आनंद तेलतुंबडे यांनी पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. शुक्रवारी पुणे न्यायालयाने तेलतुंबडे यांचा जामीनअर्ज फेटाळला. शनिवारी पहाटे मुंबई विमानतळावरून पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांना ताब्यात घेतले. तेलतुंबडे यांना पुणे येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान, तेलतुंबडे यांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यांची सुटका करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@