‘आनंदी गोपाळ’चा ट्रेलर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. डॉक्टर होण्यासाठी आनंदीबाईंना मोठा संघर्ष करावा लागला. या संघर्षात त्यांना त्यांचे पती गोपाळराव यांनी मोलाची साथ दिली. शिक्षणासाठी गोपाळरावांनीच आनंदीबाईंना प्रेरणा दिली.
 
 
 

 

आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव यांचा जीवनप्रवास ‘आनंदी गोपाळ’ या सिनेमातून दाखविण्यात आला आहे. सिनेमातील गोपाळरावांची भूमिका अभिनेता ललित प्रभाकरने साकारली आहे. तर अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिने आनंदीबाईंची भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी आनंदी गोपाळ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@