कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकिस्तानला दणका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2019
Total Views |


 


कुलभूषण जाधव खटला स्थगित करण्याची मागणी लावली फेटाळून


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला झटका दिला आहे. कुलभुषण जाधव प्रकरणाचा खटला स्थगित करण्याची पाकिस्तानने मागणी केली होती. पाकिस्तानची ही मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जाधव प्रकरणांच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर पाकिस्तानने ही मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत खटला सुरूच राहणार जोपर्यंत दोन्ही पक्ष आपली बाजू मांडत नाहीत.

 

कथित हेरगिरी प्रकरणात पाकिस्तानच्या अटकेत असलेले कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू आहे. १८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान ही सुनावणी होणार आहे. यात सोमवारी भारताने आपली बाजू मांडली तर आज पाकिस्तानने आपली बाजू मांडली. पाकिस्तानने आपली बाजू मांडताने सुरुवातीपासूनच खोटारडेपणा सुरू केला. पाकिस्तानचे अटॉर्नी जनरल अनवर मंसूर खान भारत दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला.

 

अटॉर्नी जनरल आपली बाजू मांडताने म्हणाले, "मी स्वतः भारतीयांच्या हिंसेचा शिकार आहे. आर्मीमध्ये असताना मी भारताच्या कैदेत होतो. पाकिस्तानच्या आर्मी स्कुलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४० जणांचे जीव गेले होते. हा हल्ला अफगाणिस्तानने केला असला तरी हा भारत पुरस्कृत हल्ला होता."

 

कुलभूषण जाधव यांच्याविषयी बोलताना अटॉर्नी जनरल म्हणाले, "जाधवने शत्रू राष्ट्रांचा बदला घेण्यासाठी अनेक तरुणांना तयार केले होते. या तरुणांच्या माध्यमातून त्याला पाकिस्तानमध्ये दहशत पसरवायची होती. तसेच चीन-पाकिस्तान कॉरिडोरही त्याच्या निशाण्यावर होता. हा एका व्यक्तीचा डाव नसून याला भारताचीही साथ आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@