बेंगळुरुमध्ये दोन लढाऊ विमानांचा अपघात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
बेंगळुरू : कर्नाटकमधील बेंगळुरु येथे एअर शोच्या सरावादरम्यान दोन लढाऊ विमानांचा अपघात झाला आहे. सुदैवाने दोन्ही लढाऊ विमानातील वैमानिकांचे प्राण वाचले आहेत. या अपघातानंतर आकाशात धुराचे लोट दिसू लागले. बेंगळरु येथील येलाहंका या एअर फोर्स स्टेशनमध्ये बुधवारी एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. या एअर शोच्या सरावादरम्यान हा अपघात झाला. या अपघातात एक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
 

भारतीय वायुसेनेद्वारे बेंगुळरुच्या येलाहंका या एअर फोर्स स्टेशनमध्ये लढाऊ विमानांचा सराव सुरु होता. या दरम्यान, दोन सूर्यकिरण एअरक्राफ्ट्स उड्डाण करत असताना क्रॅश झाले. या दोन्ही सूर्यकिरण एअरक्राफ्ट्समधील वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघातात एक नागरिक जखमी झाला असून लढाऊ विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षितपणे बाहेर आले. अपघात झालेल्या दोन्ही लढाऊ विमानांचे भाग येलाहंकाच्या नव्या शहरात असलेल्या इसरो ले आऊटजवळ जाऊन पडले. हा अपघात कशामुळे झाला याचे मूळ कारण अजून कळलेले नाही. परंतु या दोन्ही लढाऊ विमानांची एकमेकांशी टक्कर झाल्याने हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे. १९९६ मध्ये सूर्यकिरण संघाची स्थापना करण्यात आली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@