सलग आठव्या दिवशी निर्देशांकांची लोळण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2019
Total Views |


मुंबई : आयटी, वित्तीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील घसरणीमुळे मंगळवारी सलग आठव्या दिवशी शेअर बाजार घसरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४५ अंशांनी तर निफ्टी ३८ अंशांनी गडगडले. दिवसअखेर सेन्सेक्स ३५ हजार ३५२.६१ अंशांवर तर निफ्टी १० हजार ६०४.३५ अंशांवर बंद झाला.

 

गेले काही दिवस गडगडणारा शेअर बाजार काही अंशी सावरेल अशी आशा गुंतवणूकदारांना मंगळवारी जाणवली मात्र, शेवटच्या सत्राला काही अवधी असताना चौफेर विक्री झाल्याने सेन्सेक्स, निफ्टी घसरणीसह बंद झाले. दिवसभरात सेन्सेक्सने ३५ हजार ७७३ अंशांचा टप्पा गाठला होता.

 
 

निफ्टीने दिवसभरात सरासरी कामगिरी केली. निफ्टीतील ५० शेअर पैकी २४ शेअर घसरणीसह बंद झाले. टीसीएस आणि टेक महिंद्रा आदी शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये होणाऱ्या घसरणीनंतरही मिडकॅप आणि स्मॉलकॅप तेजीत दिसून आले. फायनान्स, हेल्थ केअर, ऑटो, उर्जा आदी क्षेत्रात घसरण झाली. अन्य क्षेत्रात खरेदी करण्यास गुंतवणूकदारांनी पसंती दिली.

 

इमामी लिमिटेड, वेलस्पून कॉर्प लिमिटेड, शारदा क्रॉपकेम लिमिटेड, स्टरलाईट टेक्नोलॉजी, एड्युरंस, भारती एअरटेल, महिंद्रा एण्ड महिंद्रा, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बॅंक आदी शेअर वधारले. कावेरी सिड्स् कंपनी लिमिटेड, नवकार कॉर्पोरेशन, रिलायन्स पावर, एजिस लिमिडेट, टीसीएस, इन्फोसिस आदी शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@