विक्रमराव सावरकरांवरील `मनस्वी' पुस्तकाचे प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2019
Total Views |


मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारस प्रत्यक्ष विचारातूनही तितक्याच प्रभावीपणे कृतीतून साकारणारे विक्रमराव सावरकर यांच्या जीवनावर आधारित मनस्वी हे अनुराधा वसंत खोत यांनी लिहिलेले पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशित करत असून त्याचा प्रकाशन सोहळा दाजी पणशीकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी २६ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क होणार आहे.

 

`मनस्वी' हे पुस्तक यापूर्वी अनुराधा खोत यांनी लिहिलेल्या मनोरमा प्रकाशन प्रकाशित `युद्ध आमुचे सुरु' यांची दुसरी आवृत्ती असून पुनर्मुद्रित आहे. सावरकरभक्त तसेच वाचकांच्या मागणीमुळे त्याचे पुनर्मुद्रण स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकाशनपूर्व तसेच त्या दिवशी त्याची किंमत ५० टक्के सवलतीत असेल. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दूरध्वनी ९८२१३७४६२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

देशाच्या हितासाठी विक्रमरावांनी सातत्याने समान नागरी कायद्याचा अवलंब केला. मुरबाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची स्थापना त्यांनी केली असून या निवासी सैनिकी शाळेतून अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत तसेच सैन्यात आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवंत खेळाडू म्हणून लौकिक प्राफ्त करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष कृतीत सांभाळत त्यांनी हिंदुसंघटन व हिंदुरक्षणाची मोहीम राबवली. त्यामुळेच विक्रमरावांचे विचार व त्यांच्या कृतीशीलतेचे आज फार मोठे महत्त्व आहे.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@