कपिल शर्माने केली सिद्धूची पाठराखण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2019
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माने नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी बोलताना पाकिस्तानशी शांततेने चर्चा करावी. असे वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धूने केले होते. त्यानंतर सोनी चॅनेलकडून द कपिल शर्मा शोमधून सिद्धूची हकालपट्टी करण्यात आली होती. आता याप्रकरणी कपिल शर्माने सिद्धूला पाठीशी घातले आहे. सिद्धूला शोमधून काढून टाकणे हा काही या समस्येवरचा उपाय नाही. असे म्हणत कपिल शर्माने सिद्धूची पाठराखण केली.
 

मला वाटते या समस्येवर ठोस उपाय शोधून काढला पाहिजे. एखाद्याला बॅन करणे, सिद्धूला शो मधून काढून टाकणे, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला एक गोष्ट सांगा, सिद्धूला शोमधून काढून टाकल्याने या समस्येवर उपाय सापडणार असेल. तर सिद्धू स्वत: इतके समजुतदार आहेत की ते स्वत: या शोमधून बाहेर पडले असते. लोकांची दिशाभूल केली जात आहे. लोक काहीही हॅशटॅग चालवतात, #Boycottsidhu किंवा #Boycottkapilsharmashow. मला वाटते थेट मुद्द्याविषयी बोलायला हवे. समस्या जर खरेच गंभीर असेल तर मूळ मुद्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. इकडच्यातिकडच्या गोष्टी करून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. जेणेकरून लोक मूळ मुद्द्यापासून दूर जातील. असे वक्तव्य कपिल शर्माने केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कपिल शर्माने हे वक्तव्य केले.

 

एकीकडे देशभरातील नागरिक पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे याप्रकरणी पाकिस्तनशी शांततेने चर्चा करू असे म्हणणाऱ्या सिद्धूची कपिल शर्माने बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. कपिल शर्माने केलेल्या या वक्तव्यामुळे चाहत्यांकडून त्याच्याविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडिया यूजर्सनी आता ट्विटरवर #Boycottkapilsharma हा हॅशटॅग चालवला असून सध्या हा हॅशटॅग तो ट्रेंडिंगवर आहे. सोनी चॅनेलने सिद्धूला शोमधून काढून टाकले होते. अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली होती. परंतु सिद्धूची शोमधून हकालपट्टी केली नसून काही कामामुंळे पुढील काही दिवस सिद्धू शोचा भाग नसेल. त्याच्याजागी अर्चना पूरण सिंग परिक्षक म्हणून काम करेल. अशी माहिती कपिलने दिली. दरम्यान, कपिल शर्माचा कार्यक्रम पाहू नका. सोनी चॅनेलला अनसब्सक्राईब करा. कपिल शर्माला ट्विटरवर अनफॉलो करा. कपिलच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या कमी झाली पाहिजे. अशा मागण्या खुद्द कपिल शर्माच्या चाहत्यांकडूनच केल्या जात आहेत. कपिलला ट्विटरवर अनफॉलो करत असल्याचे स्क्रीनशॉट्सही चाहते शेअर करत आहेत.

 
 
 
 
 
 कपिल मी आणि माझे कुटंब तुझा कार्यक्रम नेहमी पाहत होतो. आम्ही तुझे चाहते होतो. पण आतापासून तुझा कार्यक्रम पाहणार नाही. तसेच तू ज्यात काम करशील तो सिनेमाही आम्ही पुढे भविष्यातही कधीच पाहणार नाही. मी माझ्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींनाही असेच करायला सांगेन. आज तू जो कोणी आहेस, ते फक्त तुझ्या चाहत्यांमुळे आहेस हे विसरू नकोस. असे ट्विट करून एका चाहत्याने कपिल शर्माला सुनावले.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@