आयपीएलचे काऊंटडाऊन सुरु; २३ मार्चला होणार पहिला सामना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : २०१९च्या बाराव्या आयपीएल हंगामाचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र, हे वेळापत्रक पहिल्या दोन आठवड्यांचेच असणार आहे. या हंगामाचा पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात २३ मार्च रोजी चेन्नई येथे होणार आहे. पहिल्या दोन आठवड्यांचेच वेळापत्रक जारी केले असले तरी पुढील वेळापत्रक आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

इंडियन प्रीमियर लीगच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली. पहिला सत्रात एकूण १७ सामने होणार आहेत. पहिला सामना २३ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात असून सध्याच्या वेळापत्रकानुसार शेवटचा सामना ५ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर बंगळुरू व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

 

पाहा सविस्तर वेळापत्रक


 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@