सुश्रूषाचे जन शिबीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2019   
Total Views |


विक्रोळीच्या शुश्रूषा सुमन रमेश तुलसीयानी रुग्णालयामध्ये १७ फेब्रुवारी रोजी अतिशय व्यापक स्वरूपाचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. हजारो गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. . त्याचा घेतलेला हा आढावा...

 

रुग्णांना व्याधिनाशाय।

क्षिप्रंचारोग्य हेतवे॥

शुश्रूषा सुश्रुता भूयात।

स्वया निष्काम सेवया॥

 

अर्थात, रुग्णांच्या सर्व व्याधी, दु:ख दूर व्हावीत म्हणून आम्ही आयुर्वेदातले आचार्य सुश्रुत यांनी सुरू केलेल्या निष्काम आरोग्य सेवेच्या कार्याचा वसा पुढे चालवत आहोत. विक्रोळी येथे शुश्रूषा सुमन रमेश तुलसीयानी रुग्णालयाच्या कार्याचे हे अंतरंग आहे, असे म्हणू शकतो. प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या रुग्णालयाबद्दल विक्रोळीकर आणि परिसरातील नागरिकांना अत्यंत उत्सुकता आणि आशा आहेत. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालयानेही स्वत:चा लौकिक आणि आब राखला आहे हे निश्चित. कारण, रुग्णालय म्हटल की, डोळ्यासमोर दु:ख, औषधांचा नकोसा वास, साधा सर्दी-खोकला असला तरी, त्यासाठी भाराभर तपासण्या, काही ठिकाणी तर रुग्णांना गरज नसतानाही मग दोन-चार दिवस रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवले जाते. अशाही काही घटना आहेत की गरज नसतानही किंवा काही उपयोग होणार नसतानाही रुग्णाला अनेक दिवस व्हेन्टिलेटरवर ठेवले जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय रुबाबदार वास्तूमध्ये आरोग्य सेवा देणारे शुश्रूषा रुग्णालय कसे असेल? त्याचप्रमाणे रुग्णालयाची स्वच्छ सुंदर आकर्षक इमारत, अत्याधुनिक आरोग्य सेवा, अनुभवी प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका आणि इतर सर्वच कर्मचारी, रुग्णालयात असलेलीकॅन्टीनची सोय, सुरक्षिततेसाठीची व्यवस्था एक ना अनेक कोणत्या तरी ‘फाईव्ह स्टाररुग्णालयाचा आभास देणार्‍या रुग्णालयाबद्दल विक्रोळी परिसरामध्ये चर्चा असते. ही चर्चा सामान्यत: अशीच असते की या अशा मोठ्या रुग्णालयामध्ये उपचार घेण्याचा खर्च सामान्यांच्या खिशाला परवडेल का? त्यातच रुग्णालयाने आरोग्य सेवा ही खरोखरच ‘सेवा’ म्हणून करण्याचा वसा उचलला असल्याने रुग्णालयाने उद्घाटनाव्यतिरिक्त स्वत:ची अशी जाहिरातबाजी कधीच केली नाही. १७ फेब्रुवारी रोजी या रुग्णालयामध्ये मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह, गुडघेदुखी, पाठीचा आजार, कर्करोग व आहाराविषयी सल्ला यांचा समावेश होता. ज्या व्यक्तींनी १७ फेब्रुवारी रोजी शिबिराचा लाभ घेतला असेल, त्यांना पुढील आठ दिवस सर्व तपासण्या रुग्णालयातर्फे ७० टक्के सवलतीत मिळणार आहेत. या शिबिराचा लाभ १५०० लोकांनी घेतला. या शिबिराचे उद्घाटन रमेश तुलसीयानी व महाथेरो भदन्त राहुल बोधी यांनी केले.

 

नोव्हेंबर २०१८ रोजी डॉ. सुहास गांगुर्डे यांनी सीईओ म्हणून या रुग्णालयाचा पदभार स्वीकारला. रुग्णालयाच्या सोयी-सुविधेचा लाभ गरजूंना अधिकाधिक कसा होईल, यासाठी त्यांनी विशेष सर्वेक्षण आणि अभ्यास केला. तेव्हा त्यांना आढळले की, रुग्णालयाचे बाह्य आणि अंतरंग पंचतारांकित रुग्णालयाचे असल्याने सामान्य विक्रोळीकरांना वाटते की या रुग्णालयाचा उपचार खर्च आपल्याला परवडेल का? तसेच रुग्णालयाचे नाव वस्तीपातळीवर पोहोचले तरच लोक या आरोग्य सेवेचा लाभ घेतील. दुसरे असे की, रुग्णालय सुसज्ज आहे. पण समजा अचानक हजारो रुग्ण रुग्णालयात आले, तर रुग्णालय या सर्वांना न्याय देऊ शकेल का? या सर्व बाबींचा विचार करून डॉ. सुहास यांनी विक्रोळीच्या कामगार वस्तींमधील घरोघरी पोहोचण्यासाठी या मोफत शिबिराचे आयोजन केले. त्या मागे उद्देश होता, जनतेला समाजावे की, या रुग्णालयात रूग्णांची आत्मीयतेने सेवा केली जाईल. तसेच रुग्णालयाचा उपचार खर्चही इतर रुग्णालयांपेक्षा कितीतरी कमी आहे. इथे भाराभर तपासण्या, व्हेन्टिलेटर, अतिदक्षता विभाग वगैरेंचा उपयोग गरज असेल तेव्हाच केला जाईल. डॉ. सुहास म्हणतात,“शाश्वत मानवी मूल्यांना स्मरून रुग्णांना आरोग्य सेवा देणे आणि त्यात कोणतीही कसूर न करणे हे शुश्रूषा रुग्णालयाने जपले आहे. येणार्‍या कालावधीत हे रुग्णालय विक्रोळीचे रुग्णालय व्हावे, या दृष्टीने प्रयत्न केला जाईल.” याबाबत सांगताना रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. मिलिंद शेजवाळ यांनी सांगितले की, “या शिबिरामुळे विक्रोळीमध्ये कोणत्या प्रकारच्या आरोग्य समस्या आहेत हे समजले. या शिबिराचा लाभ खर्‍या अर्थाने गरजूंसाठी झाला याचा आनंद वाटतो. या शिबिरासाठी डॉ. सुहास गांगुर्डे, निरजंन यमजाल, आदेश बनसोडे आणि चेतन गावडे यांनी खूप परिश्रम घेतले. सेवाभावी वैचारिक पार्श्वभूमी आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या शुश्रूषा सुमन रमेश तुलसीयानी रुग्णालयाचे कार्य हे आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणार्‍या व्यक्ती, संस्था आणि रुग्णालयांसाठी दिशादर्शक आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@