भारतीय हॅकरचे पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राईक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |



मुंबई : भारतीय हॅकरने पाकिस्तानच्या वेबसाईटवर 'सर्जिकल स्ट्राईक' केले आहे. भारताच्या एका हॅकर ग्रुपने पाकिस्तानच्या तब्बल २०० वेबसाईट हॅक केल्या आहेत. टीम आय-क्रूने या वेबसाईट हॅक केल्या आहेत. १४ फेब्रुवारीचा पुलवामा दहशतवादी भ्याड हल्ला आम्ही विसरणार नसल्याचे या हॅकर टीमने म्हटले असून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. यानंतर पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात असून देशभारातून बदला घेण्याची मागणी होत आहे. अशातच टीम आय-क्रू या सायबर टीमने पाकिस्तानच्या २०० वेबसाईट हॅक करून पाकिस्तानला इशारा दिला आहे. पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्या वीर जवानांना आम्ही आदरांजली वाहतो. अशा आशयाचा मजकूर त्यांनी वेबसाईटवर ठेवला आहे.

 

टीम आय-क्रूने वेबसाईट हॅक करून पाकिस्तानला आम्ही हा हल्ला विसरणार नसल्याचा इशारा दिला. हॅक केलेल्या वेबसाईटवर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पेटती मेणबत्तीचे अनिमेशन करून भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने तिरंग्याच्या रंगांमध्ये उडताना दाखविले आहेत. टीम आय-क्रूने हॅक केलेल्या वेबसाईटची यादी सोशल मीडियावरून शेअर केली आहे. दरम्यान, पाकिस्तानवरील आजपर्यंतचा हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचे बोलले जात आहे.

 

टीम आय-क्रूने हॅक केलेल्या काही वेबसाईटची यादी

 

https://sindhforests.gov.pk/op.html

https://mail.sindhforests.gov.pk/op.html

https://pkha.gov.pk/op.html

https://ebidding.pkha.gov.pk/op.html

https://mail.pkha.gov.pk/op.html

http://kda.gkp.pk/op.html

http://blog.kda.gkp.pk/op.html

http://mail.kda.gkp.pk/op.html

https://kpsports.gov.pk/op.html

https://mail.kpsports.gov.pk/op.html

http://seismic.pmd.gov.pk/op.html

http://namc.pmd.gov.pk/op.html

http://rmcpunjab.pmd.gov.pk/FlightsChartFolder/op.html

http://ffd.pmd.gov.pk/modis/op.html

http://radar.pmd.gov.pk/islamabad/op.html

http://pjm.pmd.gov.pk/cache/op.html

http://202.163.66.44:811/14-02-2019.html

http://www.urbanunit.gov.pk/upload/14-02-2019.php

https://opf.edu.pk/14-02-2019.php

https://depalpur.opf.edu.pk/14-02-2019.php

https://badin.opf.edu.pk/14-02-2019.php

https://bci.opf.edu.pk/14-02-2019.php

https://bhalwal.opf.edu.pk/14-02-2019.php

https://dadu.opf.edu.pk/14-02-2019.php

https://dikhan.opf.edu.pk/14-02-2019.php

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@