भाजपातून हाकलले कीर्ती आझाद काँग्रेसमध्ये!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी झालेले खासदार कीर्ती आझाद यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यलयात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आझाद यांनी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. याबातची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली. आझाद यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित होता. मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी आपला काँग्रेस प्रवेश पुढे ढकलला होता.

 

आझाद हे २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये दरभंगा येथून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१५ साली त्यांची भाजपने पक्ष विरोधी कारवाईच्या आरोपाखाली पक्षातून हकालपट्टी केली होती. आझाद यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासमवेत इतर नेत्यांवर आरोप केले होते. याचमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

 

कोण आहेत कीर्ती आझाद?

 

कीर्ती आझाद हे बिहार राज्यातील दरभंगाचे लोकसभा सदस्य आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री भगवती झा आझाद यांचे ते चिरंजीव असून माजी क्रिकेटपटू आहेत. दरभंगा या ठिकाणावरून ते तीन वेळेस खासदार म्हणून निवडून आले आहेत. यासोबतच १९८३ च्या विश्‍वविजेत्या भारतीय क्रिकेट संघामध्ये त्यांचा सहभाग होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@