बिना तिकीट आया हे, तो पकड जरूर जायेगा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |



मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचा फटका भारतीय रेल्वे बसत आहे. हीच बाब लक्षात घेता पश्चिम रेल्वेने एक अनोखी शक्कल लढवली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'गली बॉय' चित्रपटातील झळकलेल्या 'अपना टाईम आयेगा' या गाण्याचा वापर केला आहे. याचा वापर करून त्यांनी 'तेरा टाईम आयेगा' हे गाणे तयार केले आहे.

 
 
 

पश्चिम रेल्वेने ट्विटवरून हे गाणे लोकांसमोर आणले आहे. पश्चिम रेल्वेला या व्हिडीओमार्फत जो संदेश पोहचवायची आहे, तो साध्य होताना दिसत आहे. कारण या व्हिडीओला मुंबईकरांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओनंतर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होईल अशी आशा पश्चिम रेल्वेला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@