शहीद जवानांचे स्टेट बँक ऑफ इंडियाने केले कर्ज माफ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |



नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून मदतीचा ओघ सुरु असून यात स्टेट बँक ऑफ इंडियाचादेखील समावेश झाला आहे. बँकेने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४० पैकी २३ जवानांचे कर्ज माफ केले आहे. यासोबतच शहीद जवानांचा प्रत्येकी ३० लाख रुपयांचा विमा लवकरच त्यांच्या नातेवाईकांकडे जमा करण्यात येणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे.

 

बँकेचे चेरमन रजनीश कुमार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "या दुःखाच्या क्षणी आम्ही देशाच्या वीर जवानांच्या कुटुंबासोबत आहोत. या कुटुंबाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. अशावेळी बँकेकडून त्यांना छोटीसी मदत करण्यात येत आहे." यासोबतच एसबीआयच्या ग्राहकांना जवानांच्या कुटुंबियांना मदत करता यावी यासाठी भारत के वीरया उपक्रमाचा युपीआय तयार केला असल्याची माहिती बँकेने दिली. यासाठी बँकेच्या onlinesbi.com या वेबसाईटवर लॉग इन करुन <Payment/Transfer -> Donations -> Bharat Ke Veer> येथून शहीदांच्या कुटुंबीयांना मदत करता येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@