'पीसीबी'ची आर्थिक कोंडी ; 'पीएसएल'चे प्रसारण बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |



मुंबई : पुलवामाच्या भ्याड हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानचा निषेध करण्यात येत आहे. सर्वच बाबतीत पाकिस्तानची कोंडी होत आहे. अशातच 'पाकिस्तान सुपर लीग' या स्पर्धेचे थेट प्रेक्षेपण करण्यास डि-स्पोर्टस या वाहिनीने नकार दिल्यामुळे 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डा'चे आर्थिक कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

 

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्या ४२ सीआरपीएफ जवान शाहिद झाले. यानंतर "पाकिस्तान क्रिकेट बोर्डा"ने सुरु केलेल्या "पाकिस्तान सुपर लीग" या स्पर्धेचे प्रसारण 'डि-स्पोर्टस' या वाहिनीने थांबवण्याचा निर्णय घेतला. आम्ही राष्ट्रीय मुद्द्यांवर संवेदनशील असल्याचे सांगून हा निर्णय घेतल्याचे डि-स्पोर्टस या वाहिनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृ्त्तापत्राला सांगितले. मात्र, यावर पीसीबीने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. डि-स्पोर्टसकडे "पीएसएल"च्या भारतातल्या प्रसारणाचे हक्क होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@