महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची लघुचित्रपट स्पर्धा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लघुचित्रपट स्पर्धा आयोजित केली आहे. पर्यावरण विषयक वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धा २०१९ असे या स्पर्धेचे नाव आहे. पर्यावरण क्षेत्रात विविध अंगाने व सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणा-या लघुचित्रपट निर्मात्यांकरिता ही स्पर्धा असणार आहे. पर्यावरण क्षेत्रातील कोणत्याही विषयाबाबत लघुपट बनवून तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या स्पर्धेसाठी दि. १ जानेवारी, २०१७ नंतरच चित्रित केलेला लघुपट पात्र असणार आहे. स्पर्धकाने निर्मित केलेला लघुपट हा मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेत असावा अथवा मूकपट असावा अशी अट आहे. स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकांच्या प्रवेशिका दि. ४ मे २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मा. सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्पतरु पॉईंट, तिसरा मजला, सिनेमॅक्सजवळ, सायन सर्कल, मुंबई येथे पाठवायच्या आहेत. वेळेत प्राप्त न झालेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नसल्याचे मंडळाने सांगितले.

 

स्पर्धेचा प्रवेशिका अर्ज, नियम व अटी मंडळाच्या http://www.mpcb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून प्रवेशिका सादर करावे. यासोबतच अर्जदारांनी सीलबंद पाकिटावर 'पर्यावरण विषयक लघुचित्रपट स्पर्धा २०१९' असा ठळक अक्षरात उल्लेख करावा. असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@