म्हाडा वसाहतींच्या पायाभूत सुविधांसाठी २५० कोटीची तरतूद : मधू चव्हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |


मुंबई : म्हाडाच्या एकूण ५६ वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी म्हाडाने २५० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली. म्हाडा वसाहतींमध्ये पायभूत सुविधांचा वानवा असल्याने रस्ते, पर्जन्य वाहिन्या नव्याने उभारण्यासाठी म्हाडाने २५० कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्या मुळे म्हाडाच्या वसाहतीं मध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

 

म्हाडाने शहर आणि उपनगरात ५६ वसाहती उभरल्या आहेत १९६० ते १९७० या कालावधीत उभारलेल्या या वसाहतीमध्ये म्हाडाने अंतर्गत रस्ते, पर्जन्य वाहिन्या, जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या अशा विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधा १ चटईक्षेत्र निर्देशांक आणि रहिवाशांची संख्या विचारात घेऊन निर्माण करण्यात आल्या होत्या. यापैकी काही वसाहतींचा पुनर्विकास सुरु झालेला आहे. तर काही वसाहतींचा पुनर्विकास पूर्ण झाला आहे. अनेक वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागणार नसल्याने येथील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 

या वसाहती उभारून अनेक दशके लोटली असून आणि लोकसंख्या वाढीमुळे या पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे वसाहतीमधील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्जन्य वाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या जीर्ण झाल्या असून त्या दुरुस्तीसाठी वारंवार खर्च करावा लागत आहे. नागरिकांचीही गैरसोय होत असल्याने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची मागणी रहिवाशांकडून होत होती. त्यानुसार म्हाडाने या वसाहतींमध्ये विविध सुविधा निर्माण करून देण्यासाठी २५० कोटींची तरतूद केली असल्याची आज पार पडलेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@