क्रीडा विद्यापीठातून राज्यातील क्रीडा विकासाला चालना मिळेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2019
Total Views |


 


मल्लखांब खेळात योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना जीवगौरव पुरस्कार प्रदान

 

मुंबई : सन २०१७-१८ या वर्षांतले शिवछत्रपती पुरस्कारांचे रविवारी वितरण करण्यात आले. मल्लखांबसाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना जीवगौरव पुरस्कार तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांच्यासह खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरवण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार रविवारी गेट वे ऑफ इंडिया येथे जाहीर कार्यक्रमात खेळाडूंना देण्यात आले. या कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह क्रीडा मंत्री विनोद तावडे, क्रीडा विभागाचे प्रभारी आयुक्त नरेंद्र सोपल, क्रीडा संचालक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

"राज्यात खेळाला अधिक गतिमान करून क्रीडा क्षेत्राला रोजगाराभिमुख बनविण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे पहिले पूर्ण विकसित क्रीडा विद्यापीठ स्थापन होत आहे. यातून राज्यातील क्रीडा विकासाला निश्चितच चालना मिळेल." असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात आज काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील शहीदांना राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि उपस्थित इतर मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 
 
 

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार रविवारी गेट वे ऑफ इंडिया येथे जाहीर कार्यक्रमात खेळाडूंना देण्यात आले. मंत्री श्री. विनोद तावडे यावेळी म्हणाले की, "राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे. शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@