पंतप्रधान मोदींचे जळगावला स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2019
Total Views |

महापौर सीमा भोळे यांच्याकडून बहिणाबाईंच्या पुस्तकाची भेट

 
 
जळगाव, 16 फेब्रुवारी
जळगाव, धुळे येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान यांचे जळगाव विमानतळावर दुपारी आगमन झाले. यावेळी महापौर सीमा भोळे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या हिंदी आवृत्तीचे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन त्यांचे स्वागत केले.
धुळे येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वायू सेनेचे विशेष विमानाचे जळगाव विमानतळावर दुपारी आगमन झाले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, आ. सुरेश भोळे, आ. स्मिता वाघ, उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह महसूल विभागाचे आयुक्त व कर्मचारी उपस्थित होते.
पंतप्रधान यांच्यासोबत विमानात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल शंकरनारायणन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी होते. धुळे येथे जाण्यासाठी तीन हेलिकॉप्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी दुपारी 2.22 वा. रवाना झाले.
 
विमानतळाला छावणीचे स्वरूप
पंतप्रधानांचे आगमन होणार कळल्यावर विमानतळाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. वायू सेना, स्थल सेना, नैसेना यांची हेलिकॉप्टर होती. विमानतळावर 7 अग्निशमन दलाचे बंब, 7 रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्स, प्राधिकरण व पोलीस मिळून 800 जण बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. यासह एसपीजीच्या फोर्सने विमानतळाचा ताबा घेतला होता.
 
@@AUTHORINFO_V1@@