जो आपके मन मे हे, वही मेरे मन मे हे ; पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2019
Total Views |



बरौनी : "देशातील लोकांच्या मनात किती आग आहे, हे मी समजू शकतो. जी आग तुमच्या मनात आहे, तीच माझ्याही मनात आहे." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मेट्रो आणि खत कारखान्यांच्या उद्घाटनासाठी मोदी पाटण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुलवामा घटनेचा उल्लेख करत वरील वक्तव्य केले.

 

बिहार दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी वेगवेगळ्या योजनांचे लोकार्पण केले. त्यावेळी मोदींनी पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही उपस्थिती होती. "पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल." असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.

 

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आज हजारो कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन बिहारमध्ये होत आहे. यात पाटणा शहराला स्मार्ट बनविण्यासाठीचा प्रकल्प समाविष्ट आहे. औद्योगिक विकास आणि रोजगारसंबंधीत प्रकल्प आहेत. तसेच, बिहारमध्ये आरोग्या सुविधांची वृद्धी करण्यासाठीच्या योजनांचाही समावेश आहे." बरौनी येथून मोदींनी पाटना मेट्रो प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले. या प्रकल्पासाठी २ हजार कोटी खर्च येणार आहे. यातील २० टक्के खर्च राज्य सरकार तर २० टक्के खर्च केंद्र सरकार करेल. उर्वरीत ६० टक्के खर्च पाटणा मेट्रो महामंडळ करणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@