जम्‍मू-काश्मीरमधील 'या' ५ फुटीरतावादी नेत्‍यांची सुरक्षा काढली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2019
Total Views |



श्रीनगर : जम्मू-काश्मीर प्रशासनाने येथील सर्व फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा काढलेल्या नेत्यांमध्ये मिरवाज उमर फारूख, शबीर शाह, हाशिम कुरेशी, बिलाल लोन आणि अब्दुल घनी भट यांचा समावेश आहे. पुलवामा येथे सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी गटांकडून करण्यात येत असलेल्‍या प्रयत्‍नांचा शनिवारी राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. ‘‘पाकिस्‍तानकडून निधी मिळविणाऱ्या आणि आयएसआयसोबत संबंध ठेवणाऱ्यांच्या सुरक्षेचे पुनरावलोकन करण्यात यावे." असे राजनाथसिंह त्‍यांनी शुक्रवारी म्‍हटले होते. त्‍यानंतर शनिवारी त्‍यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करत अशा फुटीरतावादी नेत्‍यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला.

 

दहशतवादी हल्ल्यानंतर २ दिवस होऊन गेले असले तरिही जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली जमाव बंदी तशीच ठेवण्यात आलेली आहे. असे असले तरी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्विकारलेली आहे. या आत्मघातकी हल्ल्यात सुरक्षा दलाच्या ४२ शहीद झाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@