गोरेगाव फिल्मसिटी बंद ठेवून सिनेकामगारांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त होत आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ १७ फेब्रुवारी रविवार रोजी गोरेगाव फिल्मसिटी बंद ठेवण्यात आली. गोरेगावा फिल्मसिटीमध्ये रविवारी चित्रिकरण होणार नाही. अशी घोषणा सिनेकामगार संघटनेने केली.
 
 
 
 

दुपारी २ ते ४ या वेळेत चित्रिकरण तसेच पोस्ट प्रोडक्शन आणि एडिटिंगची कामेही बंद ठेवण्यात आली. अशी माहिती सिनेकामगार संघटनेने दिली. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया ऑफ सिने एम्प्लॉईज (FWICE) यांच्याकडून रविवारी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारचा दिवस हा ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात आला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 

 
@@AUTHORINFO_V1@@