देशभरात संतापाची लाट; नालासोपाऱ्यात रेलरोको

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : पुलवामा येथील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे देशभरात तीव्र निदर्शने सुरु आहेत. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आले होते. शहीद झालेल्या जवानांचा बदला घेण्याची मागणी देशातील प्रत्येक नागरिकांची दिसून येत आहे. यासाठी ठिकठिकाणी बंद, मोर्चे, निषेध रॅली काढण्यात येत आहेत तर काही ठिकाणी पाकिस्तानचे प्रतिमात्मक पुतळे जाळण्यात येत असून पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात येत आहेत. अशाच प्रकारचा निषेध नालासोपारा येथे करण्यात येत असून नागरिकांनी रेलरोको केला आहे.

 

नालासोपारा येथील नागरिकांनी बंद पळून व रेलरोको करून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. यामुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून रेल्वे प्रवासी उत्स्फूर्तपणे रेल्वे ट्रॅकवर उतरले. रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाल्याने रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. यावेळी ट्रॅकवर उतरलेल्या नागरिकांकडून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@