शहिदांच्या मुलांची सेहवाग घेणार जबाबदारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019
Total Views |



नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शाहिद झाले. यामधून सावरण्यासाठी देशभरातून अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. निवृत्त भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग यानेदेखील मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक भान जपत त्याने शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने ट्विट करत ही भावना व्यक्त केली आहे.

 
 
 

"आपण जे काही करू ते कमीच आहे. ही अतिशय छोटी गोष्ट आहे तरीही या शूरवीरांच्या मुलांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी घेऊ इच्छितो. या सर्व मुलांची काळजी माझ्या सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये घेतली जाईल. हे माझे सौभाग्य असेल."

 

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शाहिद झाले. याच्या निषेधार्थ देशभरात संतापाचे वातावरण आहे. तसेच, शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी देशभरातून अनेक हात पुढे येत आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच, हिमाचल प्रदेशमधील सरकारी कर्मचारी स्वतःचे १ दिवसाचे वेतन शहिदांच्या कुटुंबियांना देणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@