‘द कपिल शर्मा शो’ मधून सिद्धूची हकालपट्टी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : विनोदवीर कपिल शर्माच्या सुप्रसिद्ध कॉमेडी शोमधून नवज्योत सिंग सिद्धूची हकालपट्टी करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी चर्चा करून यावर तोडगा काढला पाहिजे असे वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धूने केले होते. ‘द कपिल शर्मा शो’ मधून सिद्धूला काढून टाकण्यात यावे. अशी मागणी अनेकजणांनी ट्विटरच्या माध्यमातून केली होती. सोशल मीडिया यूजर्सने केलेल्या या मागणीची दखल घेत, तातडीने सिद्धूला या कार्यक्रमातून काढण्यात आले आहे.
 

मूठभर लोकांसाठी तुम्ही पाकिस्तानला दोष का देता? असा प्रश्न सिद्धूने विचारला होता. मी या हल्ल्याचा निषेध करतो. पण पाकिस्तानशी चर्चा करून हा प्रश्न सोडवायला हवा. असे वक्तव्य सिद्धूने केले होते. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी सिद्धूला चांगलेच खडेबोल सुनावले. १४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याचा बदला घ्या, पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या. अशी मागणी देशभरातून केली जात आहे. असे असताना पाकिस्तानसोबत चर्चा करायला हवी, अशी भूमिका नवज्योत सिंग सिद्धूने घेतल्यामुळे त्याच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला.

 

#Boycottsidhu असा हॅशटॅग सोशल मीडिया यूजर्सनी ट्विटरवर चालवला. ‘सोनी एन्टरटेनमेंट’ चॅनेलने सिद्धूची या कार्यक्रमातून तातडीने हकालपट्टी केली असून ही हकालपट्टी कायमस्वरूपी करण्यात आल्याचे चॅनेलकडून सांगण्यात आले आहे. कपिल शर्मा शो मध्ये आता सिद्धूची जागा अर्चना पूरणसिंग घेणार असल्याचे कळते. अर्चना पूरणसिंगने या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात केली असून दोन एपिसोड्सचे शूटिंगही पूर्ण झाले असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु सिद्धूच्या जागी आता अर्चना पूरणसिंग दिसणार याबाबत अधिकृत माहिती चॅनेलने अद्याप दिलेली नाही.

 
 
@@AUTHORINFO_V1@@