पुलवामा हल्ला निषेध : मुंबई, ठाणे परिसरात बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019
Total Views |



मुंबई : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शाहिद झाले. याच्या निषेधार्थ देशभरात संतापाचे वातावरण आहे. जागोजागी पाकिस्तानचे झेंडे जाळले जात आहेत. ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. नालासोपारा येथे रेलरोको केल्यानंतर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. तसेच, रस्त्यावर उतरून नागरिक निषेध करत आहेत. नालासोपारा येथे झालेल्या रेल रोकोनंतर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

 

मुंबईतील विविध ठिकाणी नागरिकांनी आपापल्या परिसरात बंद पाळत हल्ल्याचा निषेध नोंदवला. तर, अनेक ठिकाणी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दक्षिण मुंबईतील ताडदेव, तसेच ग्रँड रोड परिसरात दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. मुंबईतील हाजीअली परिसरातील प्रसिद्ध हिरापन्ना मार्केटबाहेर देखील तेथील कर्मचारी आणि नागरिकांनी २ मिनिटांचे मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


 
 

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुंबईतील विविध महाविद्यालयांमध्ये विविध पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. या निषेध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. नवी मुंबईतील बेलापूर भागातही पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत कडकडीत बंद पाळण्यात आला. कळंबोलीमध्येही स्थानिक नागिरकांनी रस्त्यावर उतरून हल्ल्याचा निषेध केला. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांनी वस्त्यावस्त्यांमध्ये मोर्चे काढत हल्ल्याचा निषेध केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@