राष्ट्रवादीच्या शिलेदारावर पुण्यात गुन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019
Total Views |

 


 
 
 

पत्रकाराच्या पत्नीबद्दल समाज माध्यमात आक्षेपार्ह लिखाण

 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार म्हणून गौरवण्यात आलेल्या कार्यकर्त्यासह अन्य दोघांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार तसेच पत्रकाराच्या पत्नीबद्दल समाज माध्यमात आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल पत्रकार कृष्णा वर्पे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मोहसीन शेख, महादेव बालगुडे आणि सचिन कुंभार अशी या तिघांची नावे आहेत.

 

कृष्णा वर्पे यांचे पुण्यात एक बातम्यांचे संकेतस्थळ आहे. मोहसीन शेख, महादेव बालगुडे आणि सचिन कुंभार या तिनही कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला. सुरूवातील कुंभार यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर तिघांनी कार्यालयाचा पत्ता विचारून धमकावण्यास सुरूवात केली. दरम्यान, महादेव आणि सचिन या दोघांनी वर्पे यांच्या पत्नीविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला. तर मोहसीनने त्यांच्या आणि इतर पत्रकारांविषयी अश्लील आणि बदनामीकारक लिखाण केले.

 
 
 
 
 
त्यानंतर कृष्णा वर्पे यांनी पोलिसात तक्रात दाखल केली. दरम्यान, बालगुडे याच्याविरोधात मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी निधी कामदार यांचे बनावट फेसबुक अकाऊंट बनवून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी अजित पवार यांना फैलावरही घेतलं होतं. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे. तर मोहसीन काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरूनशिलेदार राष्ट्रवादीचे’ म्हणून गौरव केला होता.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@