भारतीय नियंत्रण रेषेवर स्फोट, लष्करी अधिकारी शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
राजौरी : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये एक लष्करी अधिकारी शहीद झाला आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये आयईडी डिफ्यूझ करताना हा स्फोट झाला असून या स्फोटात एक लष्करी अधिकारी शहीद झाले आणि दोन जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजून ताज्या असताना जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे ही घटना घडली आहे. या स्फोटानंतर नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अंधाधुंद गोळीबार केला.
 

पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी मिळून नियंत्रण रेषेच्या आत १.५ किलोमीटर अंतरावर आयईडी बसविण्यात आला होता. हा आयईडी (इम्प्रोवाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) डिफ्यूझ करताना लष्करी अधिकाऱ्याला वीरमरण आले. हे लष्करी अधिकारी कॉर्प्स ऑफ इंजिनिअरिंगचे सदस्य होते.

 
@@AUTHORINFO_V1@@