आता जो कोणी शांततेविषयी बोलेल, त्याच्या कानाखाली मारा : कंगना रणौत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019
Total Views |

 


 
 
 
मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. देशभरातून याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलिवुड पासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत अनेक दिग्गजांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. बॉलिवुड अभिनेत्री कंगना रणौतने या हल्ल्याचा निषेध करत प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ‘आता जो कोणी शांततेविषयी बोलेल, त्याच्या कानाखाली मारायला हवी.’ असे वक्तव्य करत कंगनाने नाव न घेता नवज्योत सिंग सिद्धूवर टीका केली. “एकीकडे आपल्या देशाच्या जवानांवर हल्ला होत असताना काही लोक शांततेच्या आणि अहिंसेच्या गोष्टी करतात. अशा लोकांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढायला हवी.” एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कंगनाने म्हटले.
 

वाचा संबंधित बातमी‘द कपिल शर्मा शो’ मधून सिद्धूची हकालपट्टी!

 

दरम्यान, अभिनेत्री शबाना आझमी आणि जावेद अख्तर एका कार्यक्रमानिमित्त पाकिस्तानला जाणार होते. याबद्दल प्रश्न विचारला असता, शबाना आझमी आणि जावेद अख्तर हे देशद्रोही आहेत. असे कंगना म्हणाली. शबाना आझमी आणि जावेद अख्तर हे पाकिस्तानशी संस्कृतीचे आदान-प्रदान करतात. भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्यांचे समर्थन करतात. उरी मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. असे असताना शबाना आझमी आणि जावेद अख्तरला पाकिस्तानात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जाण्याची काय गरज पडली? असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला.

 

वाचा संबंधित बातमीजावेद अख्तर, शबाना आझमींचा पाकिस्तानी दौरा रद्द

 

शबाना आझमी आणि जावेद अख्तर हे पाकिस्तानात एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जाणार होते. पाकिस्तानकडून तसे आमंत्रणही या दोघांनी स्वीकारले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात शबाना आझमी यांचे वडील उर्दु लेखक कैफी आझमी यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार होती. २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु या दोघांनी आता आपला हा पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. अभिनेत्री शबाना आझमीने कंगनाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याबाबतीत वक्तव्य करून, माझ्यावर वैयक्तिक हल्ला करण्याचा विचार ती अशावेळी करत आहे. ज्यावेळी संपूर्ण देश दु:खात बुडालेला आहे. संपूर्ण देश आज एकत्रितपणे उभा आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी जाहीर निषेध करते. देव तिला आशिर्वाद देवो.असे शबाना आझमी यांनी म्हटले आहे. दरम्यान, पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त करत कंगनाने आपल्या ‘मणिकर्णिका’ या सिनेमाची सक्सेस पार्टी रद्द केली आहे.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@