बदला घ्या; भारतमातेसाठी दुसराही मुलगा द्यायला तयार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2019
Total Views |


 


शहिद जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांचा हृद्य पिळवून टाकणारा आक्रोश


बिहार : भारतमातेच्या संरक्षणासाठी सेवेसाठी एका मुलाला गमावलं. आता पाकिस्तानला धडा शिकवावाच लागेल. यासाठी मी माझ्या दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवायला तयार असल्याची भावना शाहिद जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यात रतन ठाकूर यांच्यासह ४० जवान शहीद झाले आहेत. रतन ठाकूर हे बिहारमधील भगलपूर येथील रहिवासी होते.

 

...आन अश्रूंचा बांध फुटला

 

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या रतन ठाकूर यांचे वडिल राम निरंजन ठाकूर याना आपले अश्रू आवरता आले नाहीत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी केली. ते म्हणाले, "भारतमातेच्या संरक्षणासाठी सेवेसाठी एका मुलाला गमावलं. आता पाकिस्तानला धडा शिकवावाच लागेल. यासाठी मी माझ्या दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवायला तयार आहे. माझी गरज असेल तर मीही या युद्धात उडी घ्यायला तयार आहे." यावेळी त्यांनी "जीना है तो मरना सीखो, कदम कदम पर लड़ना सीखो" या कवितेच्या ओळी म्हणत पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी केली.

 

रतन ठाकूर २०११ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. सध्या त्यांची पोस्टिंग श्रीनगर येथील बंदीपुरा या ठिकाणी होती. ते ४५ व्या बटालियनचे जवान होते. त्यांचे २०१४ साली राजनंदनी यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना तीन वर्षाचा एक मुलगा असून राजनंदनी पाच महिन्याच्या गर्भवती आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@