आम्ही विसरणार नाही, सोडणारही नाही : सीआरपीएफचे सुचक ट्विट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2019
Total Views |


नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. ज्या सीआरपीएफच्या जवानांनी हौतात्म्य आले त्यांना श्रद्धांजली वाहत सीआरपीएफने ट्विटरदवारे दहशतवाद्यांना सूचक शब्दात उत्तर दिले आहे.

 
 

आम्ही हा हल्ला विसरणार नाही आणि हल्लेखोरांना कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांमध्ये सीआरपीएफने हल्लेखोरांना सूचक इशारा दिला आहे. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत पाकिस्तानला मोजक्या शब्दात इशारा दिला आहे.

 

दरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणांच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द करून त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे कामही भारत सरकारने सुरू केले आहे. पुलवामा हल्ल्यातील शहिदांना वंदन करत शहिदांच्या कुटूंबियांसह आम्ही आहोत. त्यांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे. हे ट्विट म्हणजे मोठा इशारा मानला जात आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@