महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचा गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2019
Total Views |



देशपातळीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मान

 

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांच्या महाराष्ट्र सायबर प्रकल्पाला देशपातळीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल द प्रेसिडेंटस ॲवार्डबेस्ट डॉक्युमेंट मॅनेजमेंटहे पुरस्कार महाराष्ट्र सायबरला देण्यात आले आहेत. कोची येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या समारंभात गुरुवारी हे पुरस्कार महाराष्ट्र सायबरला प्रदान करण्यात आले.
 

पायरसी रोखल्यामुळे द प्रेसिडेंटस ॲवार्ड

 

द ओपन ग्रुप अवार्ड फॉर इनोव्हेशन अँड एक्सलन्स परिषदेत महाराष्ट्र सायबरला डिजिटल सिक्युरिटी विभागातील मानाचा द प्रेसिडेंटस ॲवार्डप्रदान करण्यात आला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पायरसी रोखण्यासाठी व माहितीच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबरने केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल या पुरस्कारने घेण्यात आली आहे.

 

ॲम्बिस प्रणालीसाठी बेस्ट डॉक्युमेंट मॅनेजमेंट पुरस्कार

 

माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या शासकीय कार्यालये, संस्था, संघटना यांना इंडियन एक्स्प्रेस ग्रुपच्या टेक्नॉलॉजी सभा ॲवार्डने गौरविण्यात येते. या कार्यक्रमात महाराष्ट्र सायबरच्या गुन्हेगारांची माहिती डिजिटल स्वरुपात गोळा करण्याच्या ॲम्बिस प्रणालीच्या अनोख्या कामाची दखल या कार्यक्रमात घेण्यात आली. या प्रणालीस बेस्ट डॉक्युमेंट मॅनेजमेंट श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲम्बिस प्रणालीमध्ये गुन्हेगारांचे डोळ्यांचे स्कॅनिंग, चेहऱ्याची ओळख, सुमारे साडेसहा लाख अंगुलीमुद्रा डिजिटल स्वरुपात साठविण्यात आल्या आहेत. यामुळे काही क्षणात गुन्हेगारांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@