शहिदांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : जम्मू - काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या दोन्ही कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारीही राज्य शासनातर्फे उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पूर्णाकृती शिल्प व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती शिल्प यांचे अनावरण व लोकार्पण सोहळा आणि सामाजिक अधिकारिता शिबिरांतर्गत दिव्यांगांना सहाय्यक उपकरण वाटप कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

 

"बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबियांनी काळजी करू नका. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार आहे." असा विश्वास त्यांनी जवानांच्या कुटुंबियांना दिला. "पाकिस्तान हा देश भिकारी झाला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. हा जुना भारत नाही, नवीन भारत देश आहे. या भ्याड हल्ल्याला आम्ही उत्तर देणार" असे मुख्यमंत्री म्हणाले.

 
 

गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांचा आकडा ४२ वर पोहचला आहे. जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. जैशचा दहशतवादी २२ वर्षीय आदिल अहमद दार याने हा आत्मघातकी हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@