तरुण पिढीने अवयव दानाविषयी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |



ठाणे : "आज अनेकांना अवयवांची आवश्यकता आहे. आजच्या तरुण पिढीने अवयव दानाविषयी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा." असे मत ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी व्यक्त केले. पुनर्जिवन सामाजिक ट्रस्ट (ठाणे) आणि बाळगोपाळ मित्र मंडळाच्या वतीने अवयवदान दिनानिमित्त १३ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता अवयदान जनजागृती महारॅली काढण्यात आली. या महारॅलीचा शुभारंभ पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुडे सोडून करण्यात आला. त्यावेळी रॅलीत सहभागी तरुण-तरुणींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 

आमदार रविंद्र फाटक, विलास जोशी, अधिष्ठाता सौ. खडसे, डॉ. मुकेश शेरे, अमेय महाजन, आयोजक तथा पुनर्जिवन सामाजिकट्रस्टचे अध्यक्ष विलास ढमाले (अवयवदान चळवळीचे प्रणेते) आदी यावेळी उपस्थित होते. पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या उपक्रमाचे आयोजक विलास ढमाले हे राबवीत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्र, फोर्टीज् इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, शतरंगी ग्रुप, सतिष प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, सेंट जॉन बाप्टीस्ट ज्युनिअर कॉलेज, राजीव गांधी मेडिकल कॉलेज, किमया किडनी केअर ग्रुप, आर. जे. ठाकूर महाविद्यालयआदी संस्थांबरोबरच हजारो विद्यार्थी, एनएसएस, डॉक्टर्स, नर्सेस, महिला, बॅण्डपथक, अवयवदान चित्ररुपी बग्गी आदींचा यामहारॅलीत सहभाग होता.

 

अनिल उसपकर, अमित टण्णू, जिव्हाळा महिला मंडळ अध्यक्षा सौ. मंजिरी ढमाले आदींनी हा उपाम यशस्वी करण्यासाठी मेहनतघेतली. एक आगळावेगळा प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे `अवयवदान दिन' या निमित्त अवयवदान जनजागृती महारॅली वअवयवदान नोंदणी मोहीम अशा कार्पामांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १ व सायंकाळी ५ ते १० या वेळेत मासुंदा तलाव, रंगो बापूजी चौक, जांभळी नाका, ठाणे येथेअवयवदान नोंदणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अवयवदान नोदणीमध्ये एकूण १३४७ अवयवदान/देहदानाचे फॉर्म भरलेगेले, अशी माहिती आयोजक विलास ढमाले यांनी दिली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@