उरीची पुनरावृत्ती ; पुलवामामधील हल्ल्यात ४० जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |


 


श्रीनगर : जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात ४० जवानांना वीरमरण आले आहे. दहशतवाद्यांकडून झालेल्या आयईडी हल्लात ४५ हून अधिक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे या वर्षांतला हा मोठा हल्ला मानला जात आहे. जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक दिलबाग सिंग यांनी सांगितले की, "सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची टीम गाडीतून जात असताना दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. त्यानंतर दोन्हीबाजूंनी गोळीबारही झाला."

 

उरीमध्येही संशयास्पद हालचाली

 

दोन दिवसांआधी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे भारतीय लष्कराच्या कॅम्पजवळ काही संशयास्पद हालचाली दिसल्या होत्या. भारतीय लष्कराने संपूर्ण परिसरात अलर्ट जारी केला असून जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने उरी हा संवेदनशील भाग आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ असलेल्या राजरवानी आर्मी आर्टिलरी युनिट जवळ काही लोकांना पाहण्यात आले. त्यानंतर जवानांनी गोळीबार सुरु केला. पहाटे ३च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर लष्कराने वेगाने सर्च ऑपरेशन सुरू केले होते.

 
 
 

उरी येथील लष्कराच्या कॅम्पवर २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते. १८ आणि १९ डिसेंबर रोजी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतली होती. भारतीय जवान झोपेत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@