क्रीडा क्षेत्र संपन्न बनविण्यासाठी स्पोटर्स सायन्स सेंटरची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |



मुंबई : खेळाडू हा मैदानात असेपर्यंत खेळात नैपुण्य दाखवतो पण त्यांनतरच्या काळात त्याला आवडत असलेल्या क्रीडाप्रकारात पुढील अभ्यासामुळे शिकण्याची संधी त्या खेळाडूला मिळत नाही. खेळाडूंना अभ्यासासोबत त्यांच्या आवडीच्या क्रीडाप्रकारात पुढे शिकून राज्याला आणि देशाला प्रगतशील आणि गतिमान क्रीडा संपन्न बनविण्यासाठी स्पोटर्स सायन्स सेंटर सुरू करण्याची गरज असल्याचे मत क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठात २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन विद्यानगरी परिसरातील क्रीडा संकुलात दिनांक १४ ते १८ फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

स्पोटर्स सायन्स सेंटरमध्ये क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा व्यवस्थापन यांसारखे विविध क्रीडा विषय विद्यार्थांना शिकविण्यात येतील. या सेंटरमुळे क्रीडा संस्कृतीला गतीदेखील मिळेल असा विश्वास तावडे यांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या वेगवान तांत्रिकदृष्ट्या प्रगत काळात आपली तरुण पिढी ही सायबर गुलाम बनली आहे. असे असताना खेळाडू हा फक्त मैदानावर खेळून देशाची आणि राज्याची प्रगती घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळेच खेळाडू यांनी राज्याची आणि देशाची प्रगती घडवून आणण्यासाठी सायबर गुलामी विरोधातल्या चळवळीचे प्रणेते होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 

२० महाविद्यालये सहभागी होणार

 

या क्रीडा स्पर्धेत राज्यातील सर्व २० अकृषी आणि कृषी विद्यापीठे सहभागी होणार असून या क्रीडा महोत्सवात कबड्डी(पुरुष व महिला), खो-खो (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष व महिला), बास्केटबॉल (पुरुष व महिला), मार्ग व मैदानी स्पर्धा (पुरुष व महिला) या एकूण पाच खेळ प्रकारांचा समावेश असणार आहे. दि. १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या विविध स्पर्धां विद्यानगरी संकुल कलिना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय वडाळा, भवन्स महाविद्यालय अंधेरी आणि विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी तावडे यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@