मुख्यमंत्री आमचा, पंतप्रधान तुमचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |



मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या असल्या तरी शिवसेना-भाजप युतीबद्दल मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. शिवसेना भाजपचे अनेक नेते युतीबाबत सकारात्मक असातानाही अद्याप युतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. अशातच आता शिवसेनेकडून नवी मागणी करण्यात आली आहे. केंद्रात पंतप्रधान भाजपचा हवा असेल तर राज्यात मुख्यमंत्री पद हे मित्र पक्षांना द्या अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे आता युतीच्या चर्चेत नवे वळण येण्याची शक्यता आहे.

 

भाजपचे अनेक मित्रपक्ष त्या त्या राज्यांमध्ये भक्कम स्थितीत आहेत. त्यातच आता शिवसेनेनेही केलेल्या नव्या मागणीमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पंतप्रधान जर भाजपचा होणार असेल तर मुख्यमंत्री पद हे मित्रपक्षांना देण्यात यावे अशी मागणी खा. संजय राऊत यांनी केली. दरम्यान, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना इच्छुक आहे, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. जर केंद्रात भाजपला मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल तर राज्यातील मुख्यमंत्री पद त्यांनी सोडावे, अशी मागणी राऊत यांनी केली. त्यामुळे आता युतीच्या चर्चेत काय नवे वळण येईल हे पहावे लागणार आहे.

 

भाजप शिवसेना युतीचे सूत्र ठरल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. परंतु कोणत्याही पक्षाकडून मात्र अधिकृतरित्या माहिती देण्यात आली नव्हती. लोकसभेसाठी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार असल्याचे म्हटले जात होते. तर दुसरीकडे विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेना अनुक्रमे १४५ आणि १४३ जागा लढवणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर भाजपचे दिग्गजही शिवसेनेची मनघारणी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती समोर आली होती. परंतु गुरूवारी भाजपचे कोणेतेही नेते मातोश्रीवर चर्चेसाठी जाणार नसून राज्यातला तिढा राज्यातच सोडवला जाईल असे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले होते. त्यातच आता संजय राऊत यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकादा आता युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

 

१९९९ च्या फॉर्मुल्यावर ठाम

 

शिवसेना युतीसाठी १९९९ च्याच फॉर्मुल्यावर ठाम असल्याचे मत सूत्रांनी दै. मुंबई तरुण भारत शी बोलताना व्यक्त केले. येत्या काळात युती बाबत चर्चा किंवा सकारात्मक निर्णय न झाल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचाराला सुरुवात करतील असेही सूत्रांनी बोलताना सांगितले.

 

"शिवसेना भाजप युतीचा निर्णय पक्षातील ज्येष्ठ नेते घेतील. संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल बोलायचे झाले तर मित्रपक्षांमधील नितिश कुमार हे स्वत:च्याच हिंमतीवर मुख्यमंत्री झाले होते." 

माधव भांडारी, प्रवक्ते, भाजप

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@