जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |



 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सीआरपीएफ जवानांच्या गाडीला विस्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. यामध्ये ४० जवान शहीद झाले असून ४५ हून अधिक जवान जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. पंतप्रधान मोदींनी या घातपातात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच 'जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही' असे ट्विटमध्ये म्हंटले आहे.

 
 
 

नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये सांगितले आहे की, "दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला आहे. मी याचा निषेध करतो, जवानांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्व भारतीय एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शूर शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. जखमी झालेले जवान लवकर पूर्णपणे बरे होवोत"

 

देशातील सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. सर्व राजकीय नेत्यांनी ट्विटरद्वारे या घटनेचा तीव्र विरोध दर्शवला. हा हल्ला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला आहे. जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

 
 
 

'हा' आहे या हल्ल्या मागचा दहशतवादी चेहरा

 

'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला. जवानांच्या गाडीला विस्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. त्यामुळे झालेल्या स्फोटात ४० भारतीय जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदच्या आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.


 
 

तब्बल २०० किलो स्फोटकांनी भरलेली गाडी दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. तो काकापोरा येथील रहिवासी आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@