अखेर शरद पवार लढवणार माढातुन निवडणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |



मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याकडे केला होता. आमच्या विनंतीला मान देऊन ते लोकसभा निवडणूक लढवतील, असा विश्वास पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

 

‘शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह आम्ही त्यांच्याकडे केला. आमच्या विनंतीला मान देऊन ते लोकसभा निवडणूक लढवतील’, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. याव्यतिरिक्त काँग्रेसबरोबर आतापर्यंत जागावाटपाबाबत झालेल्या वाटाघाटी, पक्षाच्या वाट्याला येणारे मतदारसंघ, काही जागांबाबत निर्माण झालेला पेच, इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झाली. धर्मनिरपेक्षवादी भूमिका असणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. महाआघाडीचा मसुदा काय असावा, याबाबतही चर्चा करण्यात आली, अशी माहिती अजित पवार यांनी बैठकीनंतर दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@