घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर : जीएसटी परिषदेत मिळणार या सवलती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |


नवी दिल्ली : येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) परिषदेत सिमेंटवरील जीएसटीत २८ टक्क्यांवरुन १८ टक्के घट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय बैठकीत मंत्रीमंडळ समितीकडून निर्माणाधीन घरांवर ५ टक्के आणि परवडणाऱ्या घरांवर ३ टक्के जीएसटी लागू करण्याचा विचार केला जात आहे.

 
 
 

जीएसटी मंत्रिमंडळ समितीने यापूर्वी निर्माणाधीन घरांवर ५ टक्के कर आणि परवडणाऱ्या घरांवर ३ टक्के जीएसटी आकारला जावा, अशी शिफारस केली होती. त्यामुळे घर खरेदीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच कालावधीपासून सिमेंटवरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली जात आहे. सध्या सिमेंटवर २८ टक्के जीएसटी आकारला जात आहे.

 
यातून सरकारला वर्षाला १३ हजार कोटींचा महसूल मिळतो. हे दर १८ टक्क्यांवर आणण्याचा विचार सरकार करत आहे. सिमेंटवरील करात कपात करून परवणाऱ्या घरांच्या किमती आणखी कमी व्हाव्यात असा केंद्र सरकारचा मानस आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेत सिमेंटवरील कर कपात निश्चित मानली जात आहे.
 

परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलणार

जीएसटी परिषदेत मंत्रीमंडळ समितीच्या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांच्या किमतींची व्याख्या बदलण्यात येणार आहे. सरकारला यातून केवळ ३ टक्के जीएसटी महसुल मिळणार असला तरीही सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. सद्यस्थितीत ५० चौरस मीटर चटई क्षेत्रातील घरांना परवडणाऱ्या घरांमध्ये सामाविष्ठ केले जाते. ही मर्यादा वाढवत ८० चौरस मीटरवर नेण्यात येऊ शकते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@