‘या’ ४ बँकांना आरबीआयने आकारला कोट्यावधींचा दंड!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांना कोट्यावधी रुपयांचा दंड आकारला आहे. या चार बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यासारख्या मोठ्या बँकाचादेखील समावेश आहे. रिझर्व बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे या बँकांना दंड आकारण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठी बँक मानली जाणाऱ्या एसबीआयला आरबीआयने १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एक मोठी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदालाही १ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
 

युनियन बँकेलाही १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कॉर्पोरेशन बँकेला २ कोटी रुपयांचा दंड आकरण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, "निधीचा शेवटचा वापर, इतर बँकांसह माहितीची देवाणघेवाण, फसवणूक आणि फसवणूकीचा अहवाल आणि खात्याचे पुनर्गठन याबाबतच्या नियमांचे या ४ बँकांनी पालन केले नाही. रिझर्व्ह बँकेच्या दंडात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे या ४ बँकांना हा दंड आकारण्यात आला आहे." परंतु या ४ बँकांनी केलेल्या कोणत्याही व्यवहाराचा आणि ग्राहकांसोबत असलेल्या या बँकांच्या कराराचा आरबीआयने या निवेदनात कोठेही उल्लेख केलेला नाही.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@