तब्बल १०० वर्षांनंतर आफ्रिकेत आढळला ‘बगीरा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
आफ्रिका : मोगली सिनेमा तुम्ही पाहिला असेल, त्यातील बगीरा अर्थात ब्लॅक पँथर हा नुकताच आफ्रिकेच्या जंगलात दिसला आहे. तब्बल १०० वर्षांनी ब्लॅक पँथर आफ्रिकेच्या जंगलात दिसला आहे. ३५ वर्षीय फोटोग्राफर विल बुरार्ड लुकस याने या ब्लॅक पँथरचा फोटो टिपला आहे. गेल्या १०० वर्षांत पहिल्यांदाच ब्लॅक पँथरचा फोटो काढण्यात आल्याचा दावा विलने केला आहे. यापूर्वी १९०९ मध्ये ब्लॅक पँथर दिसला होता.
 

ब्लॅक पँथरची संख्या अतिशय कमी आहे. विल बुरार्ड लुकस हा सध्या एक बायोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आफ्रिकेच्या जंगलामध्ये ब्लॅक पँथर दिसल्याची चर्चा विलने ऐकली होती. त्यानंतर विलने या परिसरात हाय क्वालिटी डीएसएलार कॅमेरा सेट केला. विलने या कॅमेऱ्यासोबत वायरलेस मोशन सेंसर आणि तीन फ्लॅश लाइट्सचा वापर केला. विलने मादी ब्लॅक पँथरचा फोटो टिपला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना विलने माहिती दिली की, त्या रात्री पौर्णिमा असल्यामुळे प्रकाश कमी होता. तसेच पावसाच्या हलक्या सरीदेखील कोसळत होत्या. त्यावेळी ब्लॅक पँथरचे फोटो काढले.

 

 
 
फोटो सौजन्य : विल बुरार्ड लुकास  
 

ब्लॅक पँथरची संख्या जगभरात कमी आहे. ब्लॅक पँथर ही वाघाची वेगळी जात नसून गुणसूत्रातील बदलांमुळे हा वाघ संपूर्ण काळ्या रंगाचा असतो. ब्लॅक पँथर हा दिसायला खूप आकर्षक असतो. असे प्राणी अभ्यासक सांगतात. आफिक्रेच्या जंगलात तब्बल १०० वर्षांनी ब्लॅक पँथर आढळल्याने प्राणी अभ्यासकांनी आणि प्राणी प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@